Home Breaking News वाचा ! असं आहे भेंडवळ घटमांडणीचे भाकीत; केंद्रात कुणाचं सरकार येणार; ...

वाचा ! असं आहे भेंडवळ घटमांडणीचे भाकीत; केंद्रात कुणाचं सरकार येणार; पाऊस पिकांबाबतही वर्तवली अंदाज..

राहुल निर्मळ, द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क

बुलढाणा:- 350 वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली ती आजतागायत त्यांच्या वंशजांनी सुरु ठेवली आहे. त्याकाळी म्हणजे 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज हे गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया अशा एक महिन्याच्या कालावधीत त्यावेळी असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करुन नंतर त्यावर अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वर्षभराचे शेती, पाऊस, राजकीय, पृथ्वीवरील संकटे या विषयी भाकिते वर्तवत असत. परिसरातील शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असत. सध्या देखील ही परंपरा त्यांचे वंशज चालवत आहेत.
पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आली…
शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट , घटात पाणी व त्यावर कुरडया ,त्याच्या बाजूला पान सुपारी व विविध १८ प्रकारची  कडधान्ये…. अशा या ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम ,पीक पाऊस अर्थव्यवस्था ,संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकित या घटमांडणीतून केले जाते… आज  बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की ३५० वर्षांपुर्विपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते, या भविष्यवाणी कडे सर्वांचेच लक्ष लागून असते… या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते… चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून हा अंदाज जाहीर केलाय…
गेल्या वर्षी देशावर कोरोना सारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होत.., येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची ,पिकांची , देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे हे या अंदाजानुसार जाणून घेऊ यात हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका असली व या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विस्वास ठेऊन आपल्या वर्षभराच शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात. या वर्षभरासाठीचे भेंडवळ घट मंडणीतील आज जाहीर करण्यात आलेले अंदाज…

पीक पाण्याचा अंदाज

कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिके चांगली येतील व भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई  ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही.असा अंदाज करण्यात आलाय

राजकीय भाकीत

राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही, देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आलंय.

पाऊसाचा सर्वसाधारण अंदाज

पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस ,जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे.

आरोग्य विषयक

तर गेल्या वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसणार आहे.असाही अंदाज करण्यात आलाय.

(टीप : ‘भेंडवळची घट मांडणी’  या घट मांडणीतून व्यक्त झालेल्या मतांशी आम्ही सहमत आहोत असे नाही.)