Home Breaking News आ. फुंडकरांनी दिल्या ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

आ. फुंडकरांनी दिल्या ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क

 खामगाव :- आमदर आकाशदादा फुंडकर यांनी पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त सजनपुरी येथील ईदगांह मैदान येथे नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांचे भाजपच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यांचेसह भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, गणेश सोनोने, वैभव डवरे, शोहारतभाई, अनिस जमादार, वासिक सर, गुलजमा शाह, सुभाष इटणारे, आशिष सुरेका आदी भाजप कार्यकरांनीही मुस्लिम बांधवांचे स्वागत करून ईदच्या शुभेच्छा दिल्या.