लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म, त्याचे ब्राह्मणीकरण थांबवा !

 

गुरुलिंग जावळे

 

माझ्या तमाम लिंगायत धर्म बांधवांनो आज लिंगायत धर्म हा दोन पंथात विभागत आहे, असे होता कामा नये कारण लिंगायत धर्म हा महात्मा बसवेश्वर रूपी वृक्षाखाली एकवटलेला आहे . आज लिंगायत धर्माचे वैदीकीकरण करून लिंगायत धर्म बांधवांच्या मनात चुकीची विचारधारा रुजवीण्याच काम काही आपलेच भाऊ बंध करत आहेत कारण ते लिंगायत धर्माची मुळ विचारधारा स्विकारायला तयारच नाहीत कारण ते स्वतःला हिंदु धर्माचा एक घटक म्हणुन कार्य करीत आहेत परंतू अशा विचार करणाञा माझ्या भाऊ बंधांना एक विचारू इच्छीत आहे की बाबानो तुम्ही महात्मा बसवेश्वरांन ला पुर्णत्वाने अभ्यासले आहे का ? त्यांची मुळ विचार धारा जानली आहे का ? लिंगायत धर्म हा वैदीक आहे की अवैदीक आहे याचा अभ्यास केला काय ? लिंगायत धर्म हीन्दु धर्मात मोडतोय का ? मग तुम्ही मी हीन्दु असे कोणत्या अधारावर म्हणत आहात ? हीन्दु धर्माचे आचार विचार व लिंगायत धर्माचे आचार विचार यांचा मेळ बसतोय का ? या माझ्या प्रश्णांमुळे काही व्यक्ती मला लिंगायत धर्माचा वैरी समजतील कारण लिंबाचा पाला कडु असतो तसे सत्य यांना थोडेच पचणार आहे परंतू एक ध्यानात ठेवा कीतीही माझ्या लिंगायत धर्माची मुळ विचारधारा दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती झाकणार नाही म्हणतात की चोर कीती ही हुशार असला आणी कीतीही चोञा केल्या तरी एकदीवस त्याच सत्य जगजाहीर हेणार हे निश्चित आहे मग तुम्ही कीतीही माझ्या लिंगायत धर्माचे विरशैव आणि लिंगायत अशे दोन तुकडे पाडण्याचे प्रयत्न केले तरी निरर्थक आहेत कारण माझा लिंगायत धर्म बांधव आता जागृत झाला आहे . असे विचार मांडलेत की काही जनांना फार राग येत असेल तर येऊद्यांना सत्य कडू असते .

महात्मा बसवेश्वर स्थापीत लिंगायत धर्म हा समतेचा धर्म आहे पण आज लिंगायत धर्मात विषमतेचे विष पेरणारे जास्त झाले आहेत अशांना जागीच शब्दरूपी तलवारीने त्यांच्या विचारधारेचा शिरच्छेद केला पाहीजे कारण ही काळाची गरज आहे . महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारकहोते त्यांनी समाजातील वाईट चालिरीतींचा विरोध्द करुन समाजात समता , बंधूत्व ,न्याय प्रस्थापीत केले होते . त्यांनी पहीली अनुभव मंटप रूपी लोकशाही संसद बाराव्या शतकात अल्लमप्रभु यांच्या अध्यक्षत्वाखाली अठरा पगड जातींना संगे घेऊन स्थापीत केली होती .बारावे शतक हे विषमतेची खान होती त्या काळात महात्मा बसवेश्वरांनी वैज्ञानिक विचार धारेला वाव देऊन कोणत्याही असामाजीक तत्वांना न घाबरता समता प्रस्थापीत केली होती मग आज तर वैज्ञानिक यूग आहे मग माझ्या लिंगायत धर्म बांधवांनो आपली विषमते कडे का ओढ आहे ? विचार करण्याची बाब आहे.

ज्या काळात सरांमजामशाही पंडीत पुरोहीत ब्राम्हनाधीन होती त्या काळात समतेची भावना जन माणसात जागृत करून जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी नवविचारांवर अधारीत लिंगायत धर्माची स्थापना करून एेकेश्वरवादाचा पुरस्कार केला . ईष्टलिंग ही संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी निर्मान करून जनमाणसांना पुजेचा अधिकार प्राप्त करून दीला . तुम्ही म्हणशाल कसे ? हा महत्वपुर्ण प्रश्ण आहे कारण बाराव्या शतकात विषमता टोकाची होती ब्राम्हन पंडीत पुरोहीतांचे वर्चस्व असल्या कारणांने ब्राम्हन श्रेष्ट व इतर वर्ग कनिष्ट होता. जन सामान्यांना मंदीरात प्रवेश नव्हता .मंदीर ही जनसामाण्यांकडुन बांधली जात होती पण प्रवेश नव्हता विचार करा . जनसामांण्याचा मंदीरात प्रवेश झाला तर मंदीर अपविञ होत असे मग माझ्या लिंगायत धर्म बांधवांनो जनसामाण्यांकडुन मंदीर बांधतांना अपविञ होत नव्हती का ? अशा अनेक समस्या बाराव्या शतकात होत्या परंतू निधड्या छातीच्या महात्मा बसवेश्वरांनी मंदीर प्रवेशासाठी केणतेही जनआंदोलन न करत ईष्टलिंग रूपी देव आपल्या हातावर देऊन आपल्याला देव पुजेचा अधिकार देऊन मंदीर व्यवस्थेवर बहीष्कार टाकला. म्हणुन माझ्या लिंगायत धर्म बांधवांनो ईष्टलिंग बाराव्या शतकाच्या आधी नव्हता बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी ही संकल्पना अवतरून तुम्हा आम्हा सर्वांना देव पुजेचा अधिकार मिळवून दीला . बाराव्या शतकापुर्वी स्थावर लिंग होते परंतूू ईष्टलिंग नव्हता हे जेवढे लवकर आपल्या लक्षात येईल तेवढे लवकर तुम्हाला लिंगायत धर्म कळेल .

आज लिंगायत धर्माचे ब्राम्हनीकरण होत आहे असे होते कामा नये कारण लिंगायत धर्म हा स्वतंञ पुर्व काळात १८७२ ते १९३१ पर्यंत लिंगायत धर्म स्वतंञ धर्म होता व जनगणना सुध्दा स्वतंञ केली जात होती पण १९५१ मध्ये कटकारस्थान करुन लिंगायत धर्माला हीन्दु धर्माची एक पोट जात बनुन टाकली म्हणुन स्वधर्माच्या स्वतंञतेसाठी आपणाला एक न होऊ देता आपले दोन पंथात तुकडे पाडून विभागू पाहत आहेत .त्यासाठि माझ्या लिंगायत धर्म बांधवांनो कोणत्याही कटकारस्थानाला बळी न पडता एकजुटीने लिंगायत धर्म हा स्वतंञ धर्म म्हणून शासनमान्य व्हावा या करीता प्रयत्नशील रहा यश नकीच मिळेल .